बाईक रॅली व प्रचार रथाला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दाखवली हिरवी झेंडी
अकोला,दि.1- एचडीएफसी एर्गो जनरल इन्शूरन्स कंपनीच्या विद्यमाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत व अमृत महोत्सवानिमित्त दि. 1 ते 7 डिसेंबर दरम्यान पीक विमा आठवडा राबविण्यात येत आहे. या सप्ताहमध्ये पीक विमाची जनजागृती व्हावी याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात बाईक रॅली व चित्ररथाला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.
जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्देश दिले की, पीक विमा योजनेची माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा. तसेच पिक विमासंबंधी येणाऱ्या अडचणीचे निवारण करुन त्याची गैरसोय होणार नाही यांची दक्षता घ्यावी. याकरीता कृषी विभाग व एचडीएफसी इर्गो कपंनीचे समन्वयक यांनी प्राधान्याने काम करावे, असेही निर्देश दिले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक आलोक तेरानिया, जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाचे तंत्र अधिकारी संध्या करवा, जिल्हा परिषदचे कृषि विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे, एचडीएफसी इर्गो कपंनीचे जिल्हा समन्वयक रुपेश दिक्षीत, दिलीप सेन, सुनिल भालेराव, तालुका अधिक्षक शंशीकिरण जांभरुणकर, नंदकुमार माने आदि उपस्थित होते.
Post Views: 306